मुद्रिते वाचून त्यातील चुकांचे दिग्दर्शन करणे म्हणजे मुद्रितशोधन होय. वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ -पुस्तके, पुस्तिका, विज्ञापन-पत्रिका, लहानमोठी हस्तपत्रके इ. प्रकारातील कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी त्याचे मुद्रितशोधन करण्याची आवश्यकता असते. वृत्तपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ, दिवाळी अंक, अहवाल, लहान-मोठी पत्रके यासारख्या अनेक प्रकारात मुद्रित साहित्याची मोठया प्रमाणावर निर्मिती होत आहे. मुद्रित साहित्याची मोठया प्रमाणावर होणारी वाढ समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीचे लक्षण आहे. ही वाढ तिकी मोठी तितकी मुद्रितशोधकांची आवश्यक अधिक असते. म्हणून मुद्रित शोधनाचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये अभिरूची निर्माण होण्याच्या दृष्टीकोणातून अशा प्रकारचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. याच धर्तीवर मुद्रितशोधन अभ्यासक्रम प्रमाणपत्र सुरू करण्याचा मानस आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुद्रित शोधनाची संकल्पना व त्यांचे महत्व याचे ज्ञान देणे, विद्यार्थ्यांच्या प्रमाणलेखनविषयक भाशिक कौशल्यांचा विकास करणे. त्यांची उपयोजित कौशल्य व क्षमता विकसित करणे त्याचबरोबर रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबरच सक्षम, स्वावलंबी, क्षमताधिष्ठित यशस्वी मुद्रितशोधक घडविणे हा मुख्य उद्देश आहे.
- Teacher: Dr. Pravin Londhe CDOE